आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:नाशिक जिमखाना टेनिस स्पर्धेत शांभवी व द्विवीजला दुहेरी मुकूट; 14 आणि 20 वर्षीय गटात मिळवला विजय

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिमखाना आयोजित टेनिस स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात शांभवी सोनवणे हीने अंतिम फेरीत त्रिशा शेट्टीचा 6-0असा तर 20 वर्षाखालील मुलींच्या गटात शांभवी सोनवणेने अंतिम फेरीत श्रावणी पंगम हीचा 6-0 असा पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात द्विविज पाटील याने अंतिम फेरीत प्रत्युष देवरे याचा 6-3 पराभव केला तर 20 वर्षाखालील मुलांच्या गटात द्विविजने अंतिम फेरीत साहिल शेवाळे याचा 6 -1 असा पराभव करून दुहेरी मुकुट संपादन केला. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात राघवी पाटील हीने अंतिम फेरीत अक्षदा कनोजिया हीचा 6-0 असा सहज पराभव करून अजिंक्यपद मिळविले तर 12 वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यन सोनवणे याने अंतिम फेरीत वेदांत साडेकर याचा 6-3 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. नाशिक जिमखान्यात 3 ते 5 जून दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाभरातून मोठया संख्येने खेळाडू सहभागी झाले होते

स्पर्धेचा बक्षीस समारंभ संस्थेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. खेळामध्ये यश व अपयश येतच असते.त्यामुळे जिंकणा-या खेळाडूने विजयानंतर अत्यंत नम्रतेने विजयाचा आनंद साजरा केला पाहिजे तसेच पराभवाला सामोरे जाणाऱ्या खेळाडूंनी नाउमेद न होता पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करून विजयी होण्याच्या प्रयत्न केला पाहिजे असे यावेळी छाजेड यंानी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे चिटणीस राधेश्याम मुंदडा यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव शेखर भंडारी यांनी केले. याप्रसंगी स्पर्धेचे प्रमुख पंच मयूर खरोटे यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नितिन मोडक, प्रमोद रानडे, मिलिंद जोशी, झुलकरनैन जागीरदार, अभीषेक छाजेड, संजय मराठे सह पालक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...