आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Doubts On Administration In Procurement Of Hydraulic Ladders Rules And Conditions By The Fire Department Itself, Complaint Directly To The Commissioner

हायड्राेलिक शिडी खरेदीत प्रशासनावर संशय:अग्निशामक विभागाकडूनच नियम-अटीशर्थींचे उल्लंघन, थेट आयुक्तांकडेच तक्रार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेट्यवधी रूपयांच्या खरेदीत सातत्याने वादात असलेले प्रशासन पुन्हा एकदा संशयाच्या भाेवऱ्यात सापडले असून आग विझवण्यासाठी आवश्यक असलेल्या हायड्राेलिक शिडी खरेदीतही अग्निशामक विभागाकडूनच नियम व अटीशर्थींचे उल्लंघन झाल्याची तक्रार थेट आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडेच करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आता चाैकशी हाेण्याची शक्यता आहे.

शिडी खरेदीसाठी 14 जुलै रोजी निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर निविदापुर्व बैठक व त्यावर हरकती नाेंदणीसाठी अवघ्या दाेन दिवसांचीच मुदत दिली गेली. वास्तविक अन्य निविदांचा विचार केल्यास किमान दहा दिवसांचा कालावधीत दिला जाताे. दुसरी बाब म्हणजे, ब्रोटो स्कायलिप्ट ही अग्निशमन व बचावाच्या दृष्टीने 90 मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची एकमेव कंपनी असून मुंबई, ठाणे यासह भारतात विविध ठिकाणी 90 मीटरपेक्षा जास्त युनिटस आधीपासूनच अस्तित्वात आहेत.

निविदेतील अटीशर्तींमध्ये बदल

मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर येथील मागील निविदांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांचे अवलाेकन केल्यास 90 मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्मसाठी मानके ठरतात. तांत्रिक वैशिष्ट्य नसलेल्या आणि अशा प्रकारची शिडीचे उत्पादन भारतात न करणाऱ्या विशिष्ट कंपनीला नजरेसमोर ठेवून निविदा प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मनपा अग्निशमन विभागाने निविदेतील अटीशर्तींमध्ये बदल केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.

ही अट घालण्यात आली

या हायड्रोलिक शिडीचे स्पेअर पार्टस भारतात उपलब्ध नाही. कराराअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी बोली लावणारी कंपनी ही संबंधीत वस्तुंचे उत्पादन करणारी आणि गेल्या पाच वर्षात जगातील विविध अग्निशमन सेवांना किमान 100 युनिटसचा पुरवठा करणारी असावी, अशी अट निविदा प्रक्रियेत आहे. त्यानुसार 90 मीटर युनिटचे भारतात प्रदर्शन करण्यास सांगावे, असे आव्हान करण्यात आले आहे.

अकोला-गोंदियामध्ये पुरवठा

फायरस्केप कंपनीने अनुभवाच्या दाखल्यात अकोला आणि गोंदियामध्ये निधी एंटरप्राईजेसव्दारे दोन हायड्रोलिक प्लॅटफॉर्मचा पुरवठा केल्याचे म्हटले असून, याबाबत नाशिक मनपाने अकोला आणि गोंदिया या दोन्ही आस्थापनांशी पत्रव्यवहार करून शहानिशा करावी केल्यास सत्य समाेर येईल असाही दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...