आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 मिरवणुकांना परवानगी:डॉ. आंबेडकर जयंती उत्सव; 14 मिरवणुका आणि 91 ठिकाणी स्टेजला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी पोलिस परवानगी आवश्यक असल्याने पोलिस आयुक्तालयात परवानगीसाठी दाखल झालेल्या सर्व मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. १४ मिरवणुका आणि ९१ ठिकाणी स्टेजला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे जयंती उत्सव साजरा करता आला नाही. यंदा निर्बंध उठवल्याने जयंती उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिस प्रशासनाकडून शहरात जमावबंदी आदेश लागू आहेत. यात जयंती, मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

मात्र, हे सणोत्सव साजरे करताना पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. पोलिसांच्या अटी-शर्तींनुसार परवानगी दिली जात आहे. पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. आंबेडकर जयंतीसाठी मंडळांनी अर्ज केले होते. पोलिस आयुक्तालयात दाखल झालेल्या सर्व अर्जांना पोलिसांची परवानगी मिळाल्याने मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.