आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशस्त्र हल्ला:डाॅ. प्राची वसंत पवार यांच्यावर मद्यपींकडून सशस्त्र हल्ला

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुश्रुत व मणिशंकर आय हाॅस्पिटलच्या संचालिका डाॅ. प्राची वसंत पवार यांच्यावर मंगळवारी (दि. १३) सायंकाळी मद्यपींकडून सशस्त्र हल्ला झाला. डाॅ. पवार यांच्या गोवर्धन येथील फार्म हाउस परिसरात हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डाॅ. पवार या फार्म हाउस येथे गेल्या असता त्या परिसरात काही तरुण मद्य पित बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डाॅ. पवार यांनी त्यांना हटकले असता संशयितांनी यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दाेन्ही हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पाेलिस हल्लेखाेरांचा शाेध घेत हाेते.

बातम्या आणखी आहेत...