आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीन फेटाळला:डाॅ. सैंदाणेच्या जामिनावरील निर्णय लांबला; अटकेची टांगती तलवार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय प्रमाणपत्र अपहार प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त शल्यचिकित्सक डाॅ. निखिल सैंदाणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायलायाने गुरुवारी (दि. ६) राखून ठेवल्याने डाॅ. सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. याच प्रकरणातील लिपिक किशोर पगारे यांचाही जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असून तेव्हापासून दोघे फरार आहे.

ग्रामीण पोलिसांनी आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्हा रुग्णालयाचे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवत बदली करून घेतली. याप्रकरणी २१ पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. तालुका पोलिसांनी वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, लिफ्टमन कांतिलाल गांगुर्डे, खासगी डाॅ. स्वप्नील सैंदाणे, रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला अटक केली. डाॅ. सैंदाणे, डाॅ. किशोर श्रीवास, लिपिक पगारे हे तिघे फरार आहेत.

बातम्या आणखी आहेत...