आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:जालन्यातील मराठी विज्ञान संमेलनावेळी नाव बदलून प्रमुख पाहुण्यांनीच पाठवली होती कथा

नाशिक2 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक

सुमारे ४८ वर्षांपूर्वीचा प्रसंग. जालन्यात मराठी विज्ञान संमेलन भरले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान कथांना पारितोषिके दिली जात होती. पाहुण्यांच्या मनात आले, पुढल्या वर्षी आपणही स्पर्धेत भाग घ्यावा. पण, आपल्या नावाचे स्पर्धेच्या संयोजकांवर दडपण येऊ नये म्हणून मग त्यांनी आपल्या नावाच्या आद्याक्षरांमध्ये बदल केला आणि टोपणनावाने कथा पाठविली. इतकेच नाही तर आपले अक्षर संयोजकांनी ओळखू नये म्हणून ती कथा पत्नीच्या हस्ताक्षरात लिहून घेतली. त्या कथेस १९७४ साली प्रथम पारितोषिक मिळाले ती कथा होती “कृष्णविवर’ आणि कथालेखक होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष, प्रसिद्ध विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर. विज्ञान दिनाच्या निमित्ताने ही मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही आठवण सांगितली.

विज्ञान साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने १९७० सालापासून मराठी विज्ञान कथा स्पर्धा, लेखक कार्यशाळा, विज्ञान लेखकांच्या मासिक बैठका असे अनेक उपक्रम राबवले. त्यातूनच डॉ बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे यांच्यासारखे विज्ञान साहित्यिक मराठीला लाभल्याचे सांगतात. काही विद्यापीठांनी त्यांच्या एमएच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कथा हा विषय ठेवला आहे. अन्य विद्यापीठांनीही हा विषय ठेवला,कार्यशाळा घेतल्यास नवीन पिढीचे विज्ञान कथा लेखक तयार होतील अशी आशा देशपांडे यांनी व्यक्त केली.

विज्ञान साहित्याचे दोन प्रकार
१.
ललित विज्ञान साहित्य - कथा, कादंबरी, गाणी, भारूड इत्यादी फॉर्ममधील विज्ञान साहित्य.
२. ललितेतर विज्ञान साहित्य - यात विज्ञानातील संशोधन, घडामोडी, तांत्रिक बाबी सोप्या भाषेतील माहिती.

नव्या पिढीच्या विज्ञान लेखकांची गरज
सत्तरीत आम्ही सुरू केलेल्या त्या उपक्रमांमधून पुढे आलेल्या विज्ञान साहित्यिकांनी सत्तारी- पंचाहत्तरी ओलांडली आहे. मराठीत नव्या पिढीचे विज्ञान लेखक तयार होण्याची गरज आहे. विद्यापीठांच्या समन्वयाने आम्ही राज्यभर ९ विज्ञान कथा कार्यशाळा घेतल्या. त्यातून अनेक तरुण लेखक तयार होत आहेत. - अ. पां. देशपांडे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद

बातम्या आणखी आहेत...