आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेमुदत उपोषण:नाशकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने तणाव ; नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयभवानी मार्गावरील तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला महापालिका उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने सोमवारी रात्री दोनला हटवल्यानंतर मंगळवारी सकाळी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत जोपर्यंत डॉ. आंबेडकरांचा पुतळा आमच्या हवाली करीत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याची भूमिका घेतली. अखेर महापालिकेने पुतळा बसविण्याबाबत तसेच उद्यानातील टाकीलाही डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याबाबत सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ८ तासांनंतर आंदोलन मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...