आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या फिती लावून कामकाज:डॉ. अर्चना शर्मा आत्महत्याप्रकरणी निषेध; ‘आयएमए’चे काळ्या फिती लावून कामकाज

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील दौसा येथे प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बेपर्वाईचा गुन्हा दाखल झाल्याने डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि.२) निदर्शने करत काळ्या फिती लावून रुग्णसेवा देण्यात आली. मेणबत्त्या लावून डॉ. शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून शनिवारी (दि. २) मूक निषेध नोंदवण्यात आले. या प्रकरणी डॉ. अर्चना शर्मा यांना दोषी न ठरवता प्रकरणात उच्चस्तरीय तपासणी करून दोषी व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याची व त्याला अटक करण्याची मागणी सुद्धा करण्यात येत आहे, अशी माहिती आयएमएकडून देण्यात आली आहे.यावेळी नाशिक शाखेच्या अध्यक्ष डॉ.राजश्री पाटील, सचिव डॉ.विशाल पवार, खजिनदार डॉ.माधवी गोरे मुठाळ, उपाध्यक्ष डॉ.किरण शिंदे आणि डॉ गीतांजली गोंदकर, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. मनीषा जगताप उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...