आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मवीर डॉ. मुंजे यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सीएचएमइ सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम शाळेत चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये डॉ. मुंजे यांचे जीवन आणि जीवनावरील काही प्रसंग यावरील विषय देण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धेत ११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर चित्रकला स्पर्धेमध्ये १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यात डॉ. मुंजे यांचे जीवन तसेच रेखाचित्र रेखाटणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम - भारत रमेश चक्रधर, संरक्षणशास्त्र या विषयावरील चित्र रेखाटन प्रथम - स्वानंदी संदीप पाटील. सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापिका शुभांगी वांगीकर तसेच शालेय समिती अध्यक्षा सुवर्णा दाबक यांनी केले. मार्गदर्शन चित्रकला शिक्षिका सुनीता घोटकर यांनी केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदाने मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.