आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वर्षांपासून सुरू हाेते पुलाचे बांधकाम:ओढा पूल वाहतुकीसाठी खुला

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दाेन वर्षांपासून सुरू असलेले आेढा गावातील गोदावरी नदीवरील पुलाचे काम अखेर पूर्ण झाले. हा पूल शनिवारी (दि. १९) नागरिकांसाठी, वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे सगळ्यांचाच वेळ वाचत आहे आणि जुन्या खराब रस्त्यावरील वाहतूक बंद हाेत नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने प्रवास सुखकर हाेत आहे.

हा पूल एकलहरे गावाकडून अौरंगाबाद मार्गाला जोडला जातो. या मार्गावर जाण्यासाठी किमान पाच किमीचा फेरा मारावा लागत होता. पुलामुळे हे अंतर जवळ आले असून शेतकऱ्यांना आता औरंगाबाद मार्गावर जाण्यासाठी कमी कालावधी लागत आहे. पूल सुरू होण्यासाठी माजी सरपंच शंकरराव धनवटे यांच्यासह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते.

चार किलोमीटरवर मुंबई-आग्रा व नाशिक-पुणेराेड चौफुलीकडे जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर अोढा आणि एकलहरे पंचक्रोशीतील नागरिकांचा संपर्क तुटत होता. लवकरच या पुलाचे अौपचारिक उद्घाटन होणार आहे. पूल सुरू झाल्याने नागरिकांनी समाधन व्यक्त केले आहे. पूल सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत आणि नागरिकांकडून पाठपुरावा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...