आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याने सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. आता सुरगाणा तालुक्यातील घोडांबे येथील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. तालुक्यातील घोडांबे परिसरातील गावांमध्ये भात, वरई, नागली, खुरसणी, टोमॅटो, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. या पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक गाडा अवलंबून आहे. मात्र, या पिकांवर सातत्याने येणारी नैसर्गिक संकटे, अपेक्षित दर न मिळणे यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात नवनवीन प्रयोग राबवणे सुरू केले आहे. आता घोडांबे येथील श्रीराम गायकवाड यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड करून पारंपरिक शेतीला फाटा दिला आहे. ड्रॅगन फ्रुट अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी आहे.
मागील सहा वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची शेती करीत आहेत. गायकवाड यांच्याकडे ३ एकर शेती असून त्यांनी अर्ध्या एकरात स्टॉबेरी तर एक एकरात ड्रॅगन फ्रुटचा यशस्वी प्रयोग केला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या एका रोपाची किंमत ४० ते ४५ रुपये आहे. एक एकर लागवडीसाठी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च होतो. फळ हे जून ते सप्टेंबर या चार महिन्यापर्यंत येत असतात. एकरी उत्पन्न पाच ते सहा लाख रुपये मिळत आहे. मुंबई, सुरत, बडोदा, अहमदाबाद येथील बाजारपेठेत एका किलोस १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे . सध्या त्यांच्या बागेला सहा वर्ष झाले असून योग्य प्रकारे उत्पादन मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.