आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणमुक्ती:मलनिस्सारण प्रकल्प आराखडा वर्षभरापासून केंद्राकडेच पडून ; दत्तक पिता फडणवीस यांचे नाशिककडे दुर्लक्ष

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपातील तत्कालीन सत्ताधारी भाजपने पाठवलेला मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरण आणि क्षमतावाढीचा ४०० कोटींचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारकडे धूळखात पडून आहे. नाशिकचे ‘दत्तक पिता’ देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचा सूर व्यक्त होत आहे, मात्र राज्यस्तरीय घडामोडींमुळे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असून मार्च महिन्यात सत्ताधारी भाजपने एकापाठोपाठ एक विकास योजनांचा बार उडवला होता. विकासाच्या वाटेवर असलेल्या नाशिकच्या दृष्टिकोनातून ही बाब महत्त्वपूर्ण आहे. सद्यस्थितीमध्ये वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याची मर्यादा १० बीओटीच्या आतच असावी असा नियम बघता महापालिकेची अडचण झाली आहे. याचे कारण म्हणजे यापूर्वी महापालिकेने ३० बीओटी क्षमतेनुसार उभारलेली मलनिस्सारण केंद्रे उपयोगाची नाही. ही बाब लक्षात घेत महापालिकेने मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढीसाठी ४०० कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला सादर केला आहे. मात्र, एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटल्यानंतरही केंद्र शासनाकडून यापूर्वी पाठपुरावा करणारे भाजपचे नेते नेमके कोठे गेले हा प्रश्न आहे. लवकरात लवकर हा आराखडा मंजूर होऊन प्रत्यक्ष कामकाज सुरू व्हावे, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करीत आहे. मनपा निवडणुकीच्या प्रतिक्षेत मलनिस्सारण प्रकल्पाच्या आराखड्याकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...