आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआनंदछाया, मौले हॉलजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या भिंतीला व स्लॅबला मोठे तडे गेल्याने एेन पावसाळ्यात धोकादायक स्थिती निर्माण झाली असून जीवितहानी होऊ शकते. मौले हॉल परिसराजवळ खासगी रुग्णालय, शॉपिंग सेंटर, धार्मिकस्थळ असल्याने या परिसरात महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी महिला व पुरुष अशी सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती केली होती.
योग्य देखभालीअभावी स्वच्छतागृहांची दैन्यावस्था झाली आहे. प्रवेशद्वारसमोरील भिंतीला व स्लॅबला मोठमोठे तडे पडून ती मागच्या बाजूला झुकली असल्याने ती पडून जीवितहानी होऊ शकते. तसेच वारंवार गटार चोकअप होत असल्याने शौचालयातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे. या पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्वरित धोकादायक भिंत व चोकअपची दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तात्काळ पाहणी करावी
शौचालयाचे छत व भिंती पडण्याच्या स्थितीत आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांनी अद्यापही धाेकेदायक स्वच्छतागृहांची पाहणी केली नाही.
अॅड. कांचन तुपलोंढे, सामाजिक कार्यकर्ते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.