आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाई:शेतीच्या निकालासाठी लाच घेणारा चालक अटकेत

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतजमीन विकत घेतल्यानंतर वाद निर्माण झाल्याने त्र्यंबकेश्वर- इगतपुरी उपविभागीय कार्यालयात सुरू असलेल्या दिवाणी खटल्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी दीड लाखाची लाच घेणाऱ्या उपविभागीय कार्यालयातील एका वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अनिल बाबूराव अागिवले (४४) असे या लाचखोर चालकाचे नाव अाहे. जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढत असून चालू आठवड्यात चौथी घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, शिरसाठे (ता. इगतपुरी) येथे शेतजमीन विकत घेण्यासाठी विसार पावती नोटरी केली होती. मात्र या मिळकतीमध्ये हरकती प्राप्त झाल्याने तक्रारदाराने तत्कालीन उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वर-इगतपुरी येथे तक्रार केली होती. हा वाद बरेच दिवस सुरू असल्याने चालक अागिवलेने निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी २४ फेब्रुवारीला २ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये लाच घेतली होती. तक्रारदाराने निकालाबाबत विचारले असता चालकाने उर्वरित लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी करत सापळा रचून अटक केली.

बातम्या आणखी आहेत...