आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअपबाबत संधी:कोडिंगच्या सहाय्याने ड्रोन ऑटोमेशन; विद्यार्थ्यांना वर्षभर स्टार्टअपची संधी

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साॅफ्टवेअरच्या माध्यमातून नवीन ड्रोन टेक्नाॅलाॅजी विकसित होत असून त्याचा उपयोग डिफेन्ससह वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. ड्रोन टेक्नाॅलाॅजीमध्ये आता कोडिंगचा वापर केला जात आहे. त्यामुळे ड्रोन टेक्नाॅलाॅजी आॅटोमेशन पद्धतीने वापरता येऊ लागली आहे. ड्रोन ऑटोमेशनसाठी कोडिंग करण्याच्या पद्धत्ती, डेटाबेसचा वापर याविषयी अभियांत्रिकीसह इतर शाखांच्या विद्यार्थ्यांना कोडिंग क्लब सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना वर्षभर स्टार्टअपबाबत संधी मिळणार आहे.

संदीप अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डिस्ट्रिक्ट टिंकेर्निंग लॅब व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक कोडिंग क्लबची स्थापना करण्यात आली. या कार्यशाळेत शहातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी फ्लाईटबेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कोडिंगसाठी हे गरजेचे
एचटीएमएल व सीएसएस प्रोग्रामिंग लँग्वेज आवश्यक
जावास्क्रिप्ट, पीएसपी, पायथोन या लँग्वेजची माहिती गरजेची.
वेबसाइट, मोबाइल अॅप, व्हिडिओ गेम्स, ऑटोमेशन टेक्नाॅलाॅजी विकसित करता येते.
सॉफ्टवेअरची माहिती गरजेची.

बातम्या आणखी आहेत...