आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील संदीप फाउंडेशनमधील विद्यार्थी संदीप टीबीआय इन्क्युबेशन सेंटर अंतर्गत नाेंदणी झालेल्या फ्लाय लॅब सोल्युशन्स या स्टार्ट अपच्या माध्यमातून ड्राेन तयार करत आहेत. संशाेधन निधी उपलब्ध झाल्याने त्यांच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. सध्या सव्वा एकरवरील पिकांवर औषध फवारणीसाठी अर्धा दिवस जातो. परंतुु, ड्रोनद्वारे हे काम १५ मिनिटांत होईल. शिवाय शेतीच्या पाण्याचे नियंत्रण आणि मृदा संशोधनासाठी तो उपयुक्तही ठरेल. ड्रोनचा प्रोटोटाईप तयार असून सहा महिन्यांत बेळगाव ढगा परिसरात पिकांवर या ड्राेनद्वारे औषधांची फवारणी हाेणार आहे. पारंपरिक औषध फवारणीत खर्च तर अधिक येतोच शिवाय अतिरिक्त औषधांचा मारा शरीराला धाेकादायकही ठरतो तो या मुळे टळणार आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आशा
फवारणीसाठी किसान ड्राेनच्या वापराला चालना देण्यासाठी स्टार्ट अप संस्कृती आणणार असल्याची घाेषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केल्याने या संशाेधनाला चालना मिळू शकेल अशी आशा आहे. - प्रा. डाॅ. गायत्री फडे, मार्गदर्शिका, फ्लाय लॅब सोल्युशन्स स्टार्ट अप
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये चाचणी
काेराेना काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या तपासण्यांचे रिपाेर्टस, आैषधे, रक्ताच्या पिशव्या, सॅम्पल्स पाेहाेचविणे शक्य आहे का याची चाचणी या संशोधकांच्या चमूने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये घेतली हाेती. एका विभागातून दुसऱ्या विभागात तपासण्यांचे रिपाेर्टस, आैषध पाेहाेचविणे या माध्यमातून शक्य असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
असा आहे कृषी ड्रोन
राेहन शिंदे, शुभम माेडक, अथर्व नाईक, किरण जामकर, अक्षिता खरात, निर्मल पटेल, सुधीर पवार ड्राेन तयार करत आहेत. दहा लिटरची टाकी वाहून नेता येईल एवढी क्षमता. ड्राेनची बॅटरी किमान ३० मिनिटांपर्यंत काम करेल. ड्रोनचे सेन्सर्स वातावरणाची माहितीही देतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.