आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:दिंडोरीरोडला रस्त्यावर फेकली औषधे; कारवाईची मागणी

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरीरोडवरील महालक्ष्मी थिएटरजवळील मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणांत औषधांचा साठा रस्त्यावरच फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या औषधांचा साठा बेवारसपणे फेकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. सुमारे पाचशे ते हजार गोळ्यांचे स्ट्रीप उघडून फेकल्या आहेत. यातील बहुतांशी औषधे व गोळ्या आयुर्वेदिक आहेत. तर काही वेदनाशामक औषधांचे पाकिटे आहेत. काही औषधांच्या स्ट्रीप मुदतबाह्य आहे. या गोळ्यांच्या नावांवरून डॉक्टरांना विचारले असता संधिवातावरची ही औषधे असल्याचे सांगितले. उघड्यावर औषधे फेकणे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने हा साठा तातडीने जप्त करून त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती पंचवटी मनपा विभागीय अधिकारी कैलास राबडीया यांनी दिली.

औषध फेकणाऱ्यांना शोधून कारवाई करणार
औषधसाठ्यातील काही औषधे तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जाईल. अशा पद्धतीने औषधांचा साठा जो मुदतबाह्य झाला असला तरी त्या उत्पादक कंपन्या स्वत: विक्रेत्यांकडून घेऊन योग्य पद्धतीने नष्ट केले जातात. मात्र, अशा पद्धतीने रस्त्यावर उघड्यावर औषधे फेकणाऱ्यांचा शाेध घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. - सुशांत देशमुख, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन

बातम्या आणखी आहेत...