आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नशे की तबाहकारीया':जेष्ठ धर्मगुरू हजरत मोईन मिया यांच्या हस्ते नाशिकमध्ये झाले पुस्तकाचे प्रकाशन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक तरुण एमडी ड्रग्ज, गांजा, अफू, चरस, कोकेन आदी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याचे मोहीमेत समोर आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक मशिदींचे मुख्य इमाम, शिक्षक, पालक, समाजसुधारक,पत्रकार आणि राज्यकर्ते यांनी अमली पदार्थांपासून तरुण पिढी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

यासाठी शहरात तहेरीके आशिक-ए-रसुल कमेटीकडून 'ड्रग्ज फ्री नाशिक' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबरांचे वंशज ऑल इंडिया सुन्नी जामिअतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मोईन मिया यांच्या हस्ते 'नशे की तबाहकारिया' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

हजरत मोईन मीया हे नाशिक दौर्‍यावर आलेले असतांना वडाळा रोडवर त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खतिब ए शहर हाफिज हिसामोद्दीन साहब खतिब, सय्यद आसिफ ईकबाल, हाफिज जाहीद, हाफिज समीर कोकणी, हाफिज हसन कोकणी, मौलाना इब्राहीम आदी उपस्थित होते.

व्यसन तरुणाईसाठी फॅशन

देशाला तरुणाईच्या रुपात मोठी संपत्ती लाभली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. शालेय वयातच अनेकजण व्यसनांना बळी पडत आहेत. व्यसन हे तरुणाईसाठी फॅशन बनत आहे.

जनजागृती व नशाविरोधी कार्यक्रम

अशा बिघडत्या परिस्थितीत तरुणाईला व्यसनमुक्त करण्याचे काम मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबरांचे वंशज ऑल इंडिया सुन्नी जामिअतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मोईन मिया यांच्याकडून राज्यभरातील विविध जिल्ह्यात जनजागृती व नशाविरोधी कार्यक्रम घेऊन हजारो तरुणांना व्यसनमुक्त करत आहे.

'ड्रग्ज फ्री नाशिक' मोहीम

आजची तरुण पिढी बिघडत आहे असा आरोप होत असताना व्यसनाधीन तरुणाईला सावरण्यासाठी हजरत मोईन मिया यांनी मौलाना व मस्जिदच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.त्यांच्या माध्यमातूनच नाशिकम मागील सहा महिन्यापासून 'ड्रग्ज फ्री नाशिक' मोहीम सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...