आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:घोटी टोलनाक्याजवळ 4 लाख रुपये किमतीच्या अमली पदार्थ जप्त

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोल नाक्याजवळील हॉटेल खंडोबासमोर एका वाहनाच्या झडतीत ४ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी अमली पदार्थासह १० लाखाचे वाहन घोटी पोलिसांनी जप्त केले. संदेश बबन भोईर (३५, रा. जिजामाता नगर, वाशिंद, ता. शहापूर, जि. ठाणे) व चालक अक्षय रमेश रेलेकर (२७, रा. ड्रिमलँड पार्क, वाशिंद, जि. ठाणे) यांना अटक केली. पोलिस नाईक प्रसाद दराडे यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली.

माहितीनुसार, पोलिसांना घोटीजवळ एका गाडीतून अमली पदार्थ तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घोटीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोल नाक्याजवळील खंडोबा हॉटेलसमोर महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही (एमएच ०४ केडब्ल्यू ८९४९) या गाडीची झडती घेतली असता १९ किलो ४७४ ग्रॅम मादक पदार्थ सापडले. ज्याची किमंत ४ लाख रुपये आहे. पोलिसांनी २ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ व ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा ४ लाख ३० हजार रुपये आणि १० लाख रुपये किमतीचे वाहन असे एकूण १४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...