आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेठरोडच्या धूळ, खड्ड्यांमुळे एल्गार:पेठराेडवरील खड्डे अन‌् धुळीमुळे नागरिक अचानक उतरले रस्त्यावर

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून गुजरातकडे जाणाऱ्या नॅशनल हायवे असलेल्या पेठरोडवरील राऊ हाॅटेल ते महापालिका हद्दीपर्यंत रस्त्याची झालेली चाळण आणि त्याचवेळी उडणारी प्रचंड धूळ यामुळे वाहतुकीला अडथळा तर हाेतच आहे मात्र नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आल्याने आणि या समस्येकडे प्रशासन लक्षच देत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी साेमवारी अचानक रस्त्यावर उतरून रास्ता राेकाे करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी हे आंदाेलन दडपण्याचा प्रयत्न केल्याने पाेलिस अन‌् नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेरीस मनपाच्या अधिकाऱ्यांनी दाेन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही काेणालाही जुमानता आंदाेलन करतील, असा इशारा नागरिकांनी दिला आणि आंदाेलन मागे घेण्यात आले.

महापालिकेने पाेलिसांना निधी नसल्याचे पत्र दिल्याने संताप दहा दिवसांपूर्वीच नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांना पत्र देत महापालिकेकडे रस्ता काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसून स्मार्ट सिटीमार्फत रस्ता करण्याची मागणी केल्याचे सांगितल्याने नागरिक अधिक संतप्त झाले आहेत.

उद्रेकाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार; फक्त आश्वासनांवर हाेते बाेळवण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करून या समस्येची जाणीव करून दिली. मात्र आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळाले नाही. या रस्त्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहेत. आता उद्रेक झाला तर अधिकारीच जबाबदार असतील - प्रभाकर पिंगळे, नागरिक

बातम्या आणखी आहेत...