आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Due To The Influence Of Western Cyclones This Year Already 15 Days Of Severe Cold, The Next Ten Days Will Be Gartha, Aurangabad 12.5 Degrees, Nashik 12.6 Degrees.

आगामी 10 दिवस राहणार गारठा:पश्चिमी चक्रवातांच्या प्रभावामुळे यंदा 15 दिवस आधीच थंडीचा कडाका; औरंगाबाद 12.5, नाशिक 12.6 अंश

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिमेकडून हिमालयाकडे आलेल्या दोन चक्रवातांमुळे यंदा राज्यात पंधरा दिवस आधीच कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राज्यात मंगळवारी सर्वात कमी १२.५ तापमान औरंगाबादमध्ये तर नाशकात १२.६ नोंदवले गेले. आगामी दहा दिवस वातावरणात असाच गारवा राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

पश्चिमी चक्रवात, उत्तरेकडून वाहणारे वारे, स्वच्छ, निरभ्र आकाशामुळे राज्यात किमान व कमाल तापमानात घट झाली. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांसाठी थंडीचा हंगाम लाभदायी ठरेल. गहू, हरभरा, हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी थंडीचा कालावधी अधिक राहणार असल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

थंडीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या तीन गाड्यांना विलंब

उत्तर भारतात वाढत्या थंडीचा परिणाम हा रेल्वे दळणवळणावर हाेऊ लागला आहे. धुक्यामुळेही गाड्या उशिराने धावत आहेत. मंगळवारी भुसावळकडे येणारी गाेरखपूर-दादर एक्स्प्रेस ३ तास, शालिमार एक्स्प्रेस व मुंबई मेल प्रत्येकी २ तास, तर अन्य गाड्या नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे विलंबाने धावल्या. मंगळवारी तीन गाड्या नियोजित वेळेपेक्षा २ ते ३ तास विलंबाने धावल्या.

निवडक शहरांचे तापमान

  • औरंगाबाद १२.५, नाशिक १२.६, महाबळेश्वर १३.५, जळगाव १३.७, उस्मानाबाद १३.८, बारामती १४.१, सातारा १४.४, परभणी १४.४, उदगीर १४.५, नगर १४.८, जालना १५.३, नांदेड १५.६
बातम्या आणखी आहेत...