आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसंग्राम फुटीच्या उंबरठ्यावर:शिंदेसेनेच्या पाठिंब्यावरून दुही; युवक प्रदेशाध्यक्ष आहेर म्हणतात, अध्यक्ष नामधारी

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेपाठोपाठ शिवसंग्राममध्येही दोन गट तयार झाल्याने संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी स्व. मेटे यांच्या स्वप्नातील राज्य घडवणे व प्रश्न सोडवण्यासाठी विश्वासू चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याचे सांगितले. संघटनेचे ९० टक्के पदाधिकारी सोबत असल्याचा दावा केला.

प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी मात्र शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्यांचा शिवसंग्रामशी संबंधच नसल्याचा दावा केला. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असून उलटसुलट चर्चेलाही उधाण आले आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर संघटनेत दोन गट तयार झाले. विशेष म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी कामे मार्गी लागण्यासाठी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्याने मतभेद स्पष्ट झाले.

मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्ष बनावे : उद्योगमंत्री उदय सावंत यांनी कामे व्हावीत म्हणून शिवसंग्रामचे पदाधिकारी माझ्याकडे येत असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्यातील एक वगळता इतरांचा शिवसंग्रामशी संबंध नाही. विनायक मेटे यांनी जिवाचे रान करून संघटना वाढवली. आम्ही प्रारंभीपासून भाजपसोबत असल्याने मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाची भूमिका निभवावी, असे मत प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी व्यक्त केले. तर युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर म्हणाले की, मराठा आरक्षणासह विविध कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्री यांचा चेहरा विश्वासू आहे. मेटे साहेबांचीही हीच भूमिका होती. भाजपने मेटेंना मंत्रिपद दिले नाही. प्रदेशाध्यक्ष शिंदे हे नामधारी आहेत. त्यांच्या सोलापूरमध्ये साधा जिल्हाध्यक्षही नाही.

बातम्या आणखी आहेत...