आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखाेराला चाेप दिला:विद्यार्थिनी झाली दुर्गा; छेड काढणाऱ्याला बदडले

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय विद्यार्थिनीची भररस्त्यात छेड काढल्यानंतर विद्यार्थिनीने दुर्गावतार घेत दंडुक्याने त्याला चांगलेच चाेपून काढले. परिसरातील नागरिकही मदतीला धावून आल्यावर त्यांनीही या टवाळखाेराला चाेप दिला. शनिवारी (दि. १९) पाथर्डी फाटा येथील एका शाळेजवळ हा प्रकार घडला. पाथर्डी फाटा परिसरात एका घटनेत विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत मद्यपी युवकाला चोप दिला. ती शाळेतून घरी येण्यास निघाली असता रस्त्यावरून जाणाऱ्या मद्यपी युवकाने तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केले. मुलीच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला.

मुलीने रस्ता बदलला मात्र संशयित पुन्हा मुलीकडे येत असल्याने मुलीने आरडाअोरड केली. मुलीचा आवाज एेकून परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. मुलीला नागरिकांनी विचारपूस केली असता तिने संशयित युवक छेड काढत असल्याचे सांगितले. नागरिकांना याचा संताप आल्याने युवकाला पकडून चांगलाच चोप दिला. रोजच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीनेही झाडाची फांदी तोडून युवकाला बदडून काढले. मुलीचा रुद्रावतार बघून नागरिकांनी तिला धीर दिला. इंदिरानगर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. मुलीच्या पालकांनी तक्रार न केल्याने गुन्हा दाखल झाला नाही.

पोलिसांची कारवाई थंड; निर्भया पथकही नाही
टवाळखोरांवर कारवाई थंडावली असल्याने शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. निर्भया पथकाकडून शाळा परिसरात गस्त होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. गस्त वाढवल्यास पोलिसांना बघून टवाळखोरी कमी होण्यास मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...