आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • During Ganeshotsav This Year, Silver Will Cost Rs.300. Durwa, 1300 Rs. Jaswand Haar: Favors Silver Idols, Ornaments And Objects Of Worship| Marathi News

तयारी गणेशाेत्सवाची:गणेशोत्सवात यंदा चांदीची चलती 300 रु. दूर्वा, 1300 रु. जास्वंद हार; चांदीच्या मूर्ती, अलंकार अन‌् पूजेच्या वस्तुंना पसंती

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव अवघ्या दाेन दिवसांवर येऊन ठेपल्याने घराघरांमध्ये सजावटीच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील सराफी पेढ्यांमध्ये साेने-चांदीच्या गणेशमूर्ती, अलंकार, दूर्वा, माेदक, जास्वंद हार यासारख्या पूजेच्या वस्तुंना मागणी वाढली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने भाविकांनी गणेशाेत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीची पर्वणी साधली. त्यामुळे बाजारपेठेत तीन दिवस अगाेदरच गणेशाेत्सवाचा फीवर चढला.

३०० रुपयांपासून गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दूर्वा तर १३०० रुपयांपासून जास्वंदाचे हार उपलब्ध आहेत. प्लास्टर आॅफ पॅरीसला नकार देतानाच अनेक घरांमध्ये आता थेट चांदीच्या गणेशमूर्ती स्थापित केल्या जात असून या मूर्ती अवघ्या २१०० रुपयांपासून उपलब्ध आहे. बुधवारी (दि. ३१) गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. नाजूक दूर्वा, मीनावर्क केलेली जास्वंदीची फुले, मोदक, रत्नजडित मुकुट, सुंदर हार, उंदीर यासह असंख्य चांदी आणि सोन्याचे दागिने गणरायासाठी सराफी पेढ्यांत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या वस्तुंना मिळतेय शहरवासीयांची पसंती
पूजा साहित्यामध्ये दूर्वा, जास्वंदीच्या फुलांचे हार, कमळ, नारळ, शमीची पाने, तोरण, पाच फळांचे सेट, तबकडी, पंचपाळे, समई, दिवे, ताम्हण, पळी पंचपात्रे अशा वस्तूंचा समावेश आहे. सोन्याच्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. काही सराफांनी गणेश अलंकार, पूजा साहित्य असे सेट तयार केले आहेत.

अत्यल्प दर असल्याने भाविकांची पसंती
दूर्वाची जुडी ३०० तर जास्वंद फुलांची माळ १३०० आणि गणेशाची मूर्ती चार हजार रुपयांपासून उपलब्ध असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही ती परवडते. याचमुळे या वस्तूंची मागणी दरवर्षी वाढत चालली आहे.
गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असाेसिएशन

चांदी-साेन्याच्याही गणेशमूर्ती
चांदीमध्ये पूजा साहित्य, माेदक, मुशक यांचे वेगवेगळ्या वजनातील प्रकार तर साेने-चांदीच्या गणेशमूर्ती सराफांकडे उपलब्ध आहेत. भरपूर प्रकार आणि बजेटनुसार उपलब्धता यामुळे साेने-चांदीच्या गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य यांची मागणी सातत्याने वाढत आहे.
मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार

बातम्या आणखी आहेत...