आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागिरणारे येथे श्री दत्त जयंती महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुवारी साजरा करण्यात आला. गिरणारेतील एकमुखी दत्त मंदिराचा 15 वा वर्धापन व मराठी भाषेच्या आद्यकवयित्री महदंबा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दत्तजयंती महोत्सवानिमित्त गिरणारे (ता नाशिक) येथील एकमुखी दत्त मंदिर व लक्ष्मी लॉन्स सभागृह येथे विविध कार्यक्रम झाले, यावेळी लक्ष्मी लॉन्स येथील सभागृहात सकाळी 11.00 ते 12.30 दरम्यान महानुभाव संप्रदायातील संत महंतांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न झाली.
याप्रसंगी धर्मसभेत संबोधित करताना अखिल भारतीय महानुभाव परिषद उपाध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेनेकर शास्त्री म्हणाले की, अपार श्रद्धा व भक्ती असली की आपल्याला देव भेटतो, त्यासाठी आत्मप्रचिती हवी, मात्र आत्मप्रचिती गुरुशिवाय शक्य नाही, भगवत गीता हेच ब्रम्हशास्र असून त्याचे अनुसरण केले तरच मानवाला भौतिक सुखातून मुक्ती मिळणार आहे, अन्यथा नाशवंत शरीरासाठी त्याची धडपड त्याला दुःखच देते, भक्ती निरपेक्ष ठेवा, तसेच भगवान श्री चक्रधर स्वामींच्या लिळेचे आचरण करा, असेही मंहत सुकेनेकर शास्त्री यांनी सांगितले.
या धर्मसभेच्या व्यासपीठावर अखिल आचार्य प्रवर सुकेनेकर शास्त्री, गोपीराज बाबा शास्त्री, श्रीधरानंद शास्त्री, महंत चक्रपाणीबाबा कोठी, विशाल महाराज कोठी, दादेराज बाबा, तपस्विनी स्वजर बाई शेवलीकर, सरला बाई पूजदेकर, अनिता लांडगे, ज्योतिषाचार्य आकाशमुनी, संतराज बाबा पुजदेकर, वाल्हेराज बाबा शेवलीकर (चांदोरी), समाधान बाबा, केशराज बाबा, चिंतामन बाबा, भाईदेवमुनी उपस्थित होते.
महंत दादेराजबाबा यांनी श्री दत्तअवतार दिनाचे महत्व सांगितले, धर्मसभेचे संयोजक महंत चक्रपाणी बाबा यांनी आद्यकवयित्री महदंबा यांच्या कार्याची माहिती दिली. तत्पूर्वी दत्तमंदिराच्या प्रागंणात धर्मध्वजाचे ध्वजारोहण प्रा.सोमनाथ घुले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर देवपूजा वंदन, आरती, उपहार, महाप्रसाद आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
जोतिषाचार्य विशालबाबा कोठी, दिलीप थेटे, नारायण उगले, आदिनाथ थेटे, मिलिंद थेटे, डॉ वाघ, दिनेश वाघ, कुलकर्णी दादा आयुर्वेदाचार्य डॉ. जमादार, हरिभाऊ थेटे, हिरामण म्हैसधूने, दशरथ मालुंजकर, दीक्षिराम कसबे,राजेंद्र लभडे, अरुण मांडे, संदीप बर्वे,शरद पिंगळे, ऋषीकेश तांबेरे, चंद्रकांत खोसकर,
प्रा. सोमनाथ घुले, नाईकवाडीचे सरपंच भास्कर खोसकर, अनिल थेटे, हरी गायकर, नाना बच्छाव, दुर्गसंवर्धक रवी माळेकर, जयराम बदादे, श्रीराम निकम, उपस्थित होते सूत्रसंचालन किर्तनाचार्य समाधान महाराज सुकेनेकर यांनी केले, चक्रपाणी बाबा कोठी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.