आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुसिव्ह:‘इ-चावडी’मुळे करवसुलीद्वारे महसुलात होणार वाढ; घरबसल्या करा करभरणा, महसूल विभागाशी संबंधित गाव नमुने 1 ते 21 अर्थात तलाठी दप्तराचे अद्ययावतीकरण, इतर गाव नमुनेही ऑनलाइन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या इ-चावडी प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांसह नागरिकांना आपले सर्व महसुली कर आता घरूनच ऑनलाइन भरता येतील. यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. शासनालाही यातून कर थकवणाऱ्यांवर नियंत्रण आणता येणार आहे. यामुळे वेळेत करवसुलीने महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन’ हा प्रकल्प सुरू केला आहे. २०१३ मध्ये महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पावर काम सुरू केले. यात जमिनीचे अभिलेख, सातबारा, सर्वप्रकारचे नकाशे या सर्वांचे आधुनिकीकरण सुरू आहे.

नवीन तंत्रज्ञान वापरून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत नागरिकांची कामे सोपी व्हावी हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. यानुसार महसूल विभागाशी संबंधित गाव नमुने १ ते २१ अर्थात तलाठी दप्तराचे अद्ययावतीकरण सुरू झाले. यातील गाव नमुना नंबर ७ आणि नमुना नंबर १२ अर्थात ७/१२ तसेच नमुना ६ आणि नमुना ८ (अ) हे देखील ऑनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले. याव्यतिरिक्त इतर गाव नमुने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी एका गावात प्रातिनिधिक स्वरूपात या प्रकल्पास सुरुवात झाली आहे. यामुळे महसुली करभरणा व वसुली प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन होईल.

बातम्या आणखी आहेत...