आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीकारार्ह बदल:ई-पासपोर्टमुळे देशाची सुरक्षा राहणार अबाधित; नाशिकला बहुमान, परदेशी जाणाऱ्या नागरिकांचा वाचणार वेळ

नाशिकरोड / सचिन वाघ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या अर्थसंकल्पात नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई पासपोर्ट तयार करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ई पासपोर्टमुळे बनावट पासपोर्टला पूर्ण आळा बसणार असल्याने देशाची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक भक्कम राहण्यास मदत होणार आहे. तसेच विमानतळावर परदेशात जाणाऱ्या नागरिकांचा वेळही वाचणार आहे.

जगातील ७० ते ८० देश ई पासपोर्ट देत आहेत. आता भारतातही ई पासपोर्टधारकांची संख्या वाढणार असून आगामी काही दिवसांत ई-पासपोर्टच ग्राह्य होईल. परदेशात जाण्यासाठी संबंधित देशाच्या दूतावासात जाऊन व्हिसा घेण्यासाठी विलंब लागतो. मात्र ई पासपोर्टमध्ये संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती राहणार असून त्यामुळे त्याच्या पासपोर्टवर पत्ता, कोणत्या देशात किती वेळेस गेला याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल. सध्या नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-पासपोर्ट तयार करण्यात येत आहे. वर्षाकाठी १ ते २ कोटीपर्यंत पासपोर्ट तयार करण्यात आले आहेत. ई -पासपोर्टमुळे बनावट पासपोर्ट होणार नसल्याने फसवणुकीला आळा बसेल. त्याचप्रमाणे देशातील जुने २५ ते ३० कोटी पासपोर्ट रद्द होऊन या नागरिकांना आता ई पासपोर्ट घ्यावे लागणार आहेत. सर्व ई पासपोर्ट नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार होणार असून दरवर्षी दीड ते दोन कोटी पासपोर्ट तयार करण्याचे काम मिळणार आहे.

गैरकामांना बसेल आळा
ई-पासपोर्टमुळे नाशिकचे नाव हे देशभर चर्चेत राहणार आहे. बनावट पासपोर्ट तयार करून देशासोबत गद्दारी करणाऱ्यांना पूर्णपणे आळा बसण्यास मदत होणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ई-पासपोर्टची जबाबदारी नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसवर सोपवली असल्याने कामगारांमध्ये आनंद आहे. - जगदीश गोडसे, सचिव, मजदूर संघ

इलेक्ट्रिक चिप महत्त्वपूर्ण
ई-पासपोर्ट तयार करताना पूर्वीच्या पासपोर्टप्रमाणे त्यावर अशोक स्तंभ राहणार आहे. मात्र या पासपोर्टमध्ये इलेक्ट्रिक चिप महत्त्वपूर्ण राहील.यामध्ये ज्या व्यक्तीचा पासपोर्ट आहे त्यांच्या बोटांची निशाणी व परिपूर्ण माहिती राहणार आहे. ही चिप स्कॅन केल्यानंतर पासपोर्टधारकाची संपूर्ण माहिती संगणकावर दिसेल.

बातम्या आणखी आहेत...