आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:जेलरोडवरील भंगारच्या गाेदामास पहाटे आग

नाशिकरोड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेलरोड येथील जुना सायखेडा राेडवरील भगवती लॉन्सजवळ भंगारचे गाेदाम व दुकानास पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला.जेलराेड परिसरातील भगवती लॉन्स, ब्रिजनगरजवळ आयूब रशीद खान यांच्या भंगारच्या दुकान व गोदामास आग लागली.

त्यात रद्दी, प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांचे साहित्य हाेते. सकाळी जाॅगिंगला जाणाऱ्या नागरिकांना येथे धुराचे लाेट दिसताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. बंब येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. चार बंबांच्या सहाय्याने दीड तासाने आग आटोक्यात आणण्यात पथकाला यश आले. परिसरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल हाेत मदत कार्यात सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...