आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकला हे देखील संवादाचे प्रभावी माध्यम आहे. यातून अनेक विषयांवर बोलता येते. विशेष करून एखाद्या गंभीर विषयावर अगदी सहजपणे कलेच्या मदतीने बोलता येते. हळुवारपणे एक एक पैलू मांडत कुठेही कटुता न ठेवता विषय उलगडून मांडण्याची ताकद कलेमध्ये असल्याचे प्रतिपादन माहितीपट निर्मात्या हंसा थपलियाल यांनी केले
यंदाही नवोदित कलाकार, वंचित समूहांतील घटक यांना आपली कलाकृती सादर करण्याची संधी देत अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंट आयोजित ९ व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचा रविवारी (दि.११) समारोप झाला. कुसुमाग्रज स्मारकात रंगलेल्या तीन दिवस चाललेल्या या फेस्टीव्हलमध्ये वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या विविध विषयांवरच्या ५० हून अधिक फिल्मसचे सादरीकरण झाले. सोबतच कार्यशाळेच्या माध्यमातून काही विषयांवर चर्चा देखील झाली.
फिल्म फेस्टिव्हलचा समारोप बेंगळूरू यांच्या द आउटसाइड इन या माहितीपटाच्या सादरीकरणाने झाला. यावेळी उपस्थिताशी बोलतांना थपलियाल म्हणाल्या की, सुरुवातीला मी देखील इतरांप्रमाणे गोंधळले होते. मात्र माहितीपटातील महिलांनी मला ताकद दिली. पुढे दिशा सापडत गेली. आत्मविश्वास अन् हिंमत यातून सर्वकाही शक्य हाेते हे मी शिकले. माहितीपटातून लगेचच कुठलाही मोठा बदल घडत नाही. मात्र लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याची ताकद मात्र नक्कीच असल्याचे त्यांनी यावेळी बाेलताना स्पष्ट केले. या कार्यक्रमास नाशिककर माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.