आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:इको फोक्स व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळ; फोटोथॉन स्पर्धेत दिलिप गिते यांना द्वितीय पुरस्कार

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इको फोक्स व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या फोटोथॉन या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मुंबईत १२ जानेवारीला पार पडला. या स्पर्धेत फोटो स्टोरी या महत्वाच्या विषयासाठी दिलीप गिते यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस डॉ. स्वाती करकरे व श्रीकांत गोरडे यांना विभागून देण्यात आला.

या स्पर्धेतील निसर्ग या प्रकारात एकनाथ मंडल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. याचबरोबर संग्राम गोवर्धने यांनी द्वितीय क्रमांक तर रुपेश कुकडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. मोबाइल या प्रकारात प्रज्वल जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याचबरोबर दिलीप गिते यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. इको फोक्स ही संस्था मुंबई, पुणे व नाशिकमध्ये ही स्पर्धा एकाच वेळी घेते.विजेत्या ठरलेल्या सर्व स्पर्धकाचे नाशिकमधील ज्येष्ठ छायाचित्रकार संजय अमृतकर, परेश पिंपळे यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...