आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईतही गणपती बाप्पा मोरया..!:मराठी कुटुंबियांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर, 500 हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणारा गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. दुबईमध्ये स्थायिक झालेले प्रणव बिरावी व स्वप्नील बिरारी या मराठी कुटुंबियांकडून गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनाचा जागर गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक वस्तूंचा आकर्षक पद्धतीने वापर करत गुहेतील बाप्पा असा अनोखा देखावा साकारण्यात आला आहे. दुबईत वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झालेल्या 500 हून अधिक मराठी कुटुंबियांनी बिरारी यांच्या घरी भेट घेऊन गणेशाचे दर्शन घेतले आहे. त्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

दुबईत स्थायिक झाल्यानंतर गेल्या 13 वर्षांपासून घरगुती गणेशोत्ससव साजरा केला जात आहे. 016 पासून पर्यावरणपूरक उत्सवाचे स्वरुप देण्यात आले. बिरारी यांनी यंदा गुहेतील बाप्पा ही संकल्पना साकारली आहे. त्यासाठी 180 किलो पेपरचा वापर करण्यात आला आहे.

100 मीटर स्टील राॅडचा वापर करून लाकडी पट्ट्या, टिश्यू पेपर, स्टील वायर, कार्ड बोर्ड, ट्रम्पोलिन व जोडीला कृत्रिम हिरवे गवताचा वापर करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्या आला आहे. दिवे, क्राॅक्रींट ब्लाॅक यांचाही वापर देखावा तयार करताना केला आहे.

पर्यावरण, किल्ल्यांच्या रक्षणाचा संदेश

पर्यावरणासह महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे रक्षण होण्याच्या दृष्टीने संदेश देणारे देखावे यापूर्वी साकारण्यात आले होते. त्यात 2016 मध्ये किल्ल्यावरील बाप्पा, 2019 मध्ये डोंगर दऱ्यातील बाप्पा तर 2020 मध्ये शेतीचा देखावा आणि 2021 मध्ये सुवर्ण मंदिरातील देखावा साकारण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...