आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बळीराजा:मिश्र फळपीक पद्धतीने वर्षभर आर्थिक लाभ

नाशिक (सचिन वाघ )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पेठ तालुक्यातील करंजाळी येथील गावंदपाडा येथील यशवंतराव गांवडे हे राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेले. पण लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने नोकरीसोबत शेती करणेही सुरू ठेवले. परंतु पारंपरिक शेतीसह आदिवासी भागात नवीन पीक पद्धतीदेखील होऊ शकते हे दाखविण्यासाठी त्यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रामध्ये मिश्र फळपीक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. या शेतामध्ये १५ बाय ५ फुटांवर १६०० आंबा रोपे, ६०० रोपे पेरू, लिंबूची ६००, कढीपत्त्याची २०० झाडे, मोगऱ्याची ५०० झाडे लावली आहेत.

गावंदे यांनी सुरक्षित शेती करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही एका पिकावर अवलंबून राहू नका, म्हणून सुरक्षित शेतीला प्राधान्य दिले. वर्षभरात ८ ते १० लाख रुपये मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते शेती करतात. केसर आंबा लागवड केल्याने या हंगामात त्यांनी ५० रुपये किलो प्रमाणे कच्चा आंबा विक्री केला. तर पेरू त्यांना सहा महिने सतत पैसे देत होता. मात्र लाॅकडाऊनमुळे विवाह सोहळा बंद पडल्याने मोगरा फुलांमध्ये त्यांना यंदा ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. फळपीक असल्याने मिलिबग, खोडकिड आणि डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव असतो. त्याची काळजी घ्यावी लागते. परंतु एकच पीक धोका देते; मात्र या प्रमाणे ही मिश्र शेती धोका न देता सतत उत्पन्न देत रहाणार.

यशस्वी होण्याची जिद्द आणि धोका पत्करून नवीन प्रयोग करण्याची आवड असली की शेतकरी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रगती साधत असतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पेठ तालुक्यातील करंजाळी येथील गावंदपाड्याचे यशवंतराव गावंडे. मिश्र फळपीक पद्धतीने सतत वर्षभर आपला आर्थिक झरा हा वाहिला पाहिजे या उद्देशाने मिश्र फळपीक शेती करुन एक प्रयोगशील आदिवासी शेतकरी म्हणून त्यांनी जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...