आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छंद:धनगर समाजाने शिक्षित होऊन इतर समाजांच्या बरोबरीने; सुसंस्कृत होण्यासाठी वाचनाचा छंद महत्त्वाचा

नाशिकरोड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहिल्यादेवींचे चरित्र समोर ठेवून वाटचाल केल्याने मी यशस्वी झाले. धनगर समाजाने शिक्षित होऊन इतर समाजांच्या बरोबरीने प्रगती साधावी. सुसंस्कृत होण्यासाठी वाचनाचा छंद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जेलरोडच्या राजराजेश्वरी मंगल कार्यालयात धनगर समाजातील विद्यार्थी, खेळाडू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अहिल्यामाता मित्रमंडळ प्रणीत यशवंतराजे सकल धनगर समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे धनगर समाज मेळावा आणि गुणवंत व समाजबांधवांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मनीषा केंद्रे, मंत्रालय उपसचिव निवृत्ती मराळे, माजी सनदी अधिकारी रघुनाथ राठोड, पोलिस निरीक्षक गणेश न्याहाळदे, विनोद ढोरे, अतुल सोनजे, संजय ढालपे, रामदास भांड, श्रावण लांडे, धनजंय बुचुडे, सुरेश कळम, शिरीष चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अभिजित लांडे, संस्थेचे अध्यक्ष सचिन भादेकर, किशोर वाघ, नितीन धानापुणे, प्रकाश लांडे प्रमुख पाहुणे होते.

समाजसेविका हिराबाई घुगरे (अहिल्या गौरव पुरस्कार), मानसी काळे (रायफल खेळाडू) यांच्यासह गुणवंत खेळाडू, विद्यार्थ्यांना रोप देऊन गौरविण्यात आले. तसेच पैठणी सोडतीत सिद्धी वाघ आणि तेजस्विनी लांडे यांना पैठणी बक्षीस मिळाली. तसेच माजी नगरसेविका रत्नमाला वाघ, पूनम पानसरे, आप्पा माने, अनंता वाघ, सचिन भादेकर, मयूर भगत, प्रदीप वाघ, शुभम गावडे, अजय वाघ, अमित आचट, हर्षद बुचुडे, अजय वारे, मुन्ना वाघ, विशाल वारे, जयंता वाघ, वैभव कांदळकर, शुभम बारगळ, श्याम वाघ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...