आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘एज्युकेशन फेअर’ला आज प्रारंभ; तज्ज्ञांचे मार्गदर्शन ; 2022’ मध्ये मिळणार नवीन कोर्सेसची माहिती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन अभ्यासक्रमांची माहिती देणाऱ्या ‘दिव्य मराठी एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’चे उद्घाटन शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक (नाशिक) प्रा. ज्ञानदेव नाठे व संदीप युनिव्हर्सिटीचे व्हाइस चॅन्सेलर डॉ. राजेंद्र सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहील. या प्रदर्शनात आजच्या काळानुरूप अॅनिमेशन, इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, स्किल डेव्हलपमेंट, मेडिकल अॅण्ड फार्मसी व ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग तसेच सायन्स, कॉमर्स, आर्ट‌्स, एमबीए यांसारख्या विविध अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. शुक्रवार दि. ३ जून ते रविवार दि. ५ जून या कालावधीत ‘दिव्य एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर २०२२’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका हॉल येथे करण्यात आले आहे. या शैक्षणिक प्रदर्शनास भेट देणाऱ्यास लकी ड्रॉद्वारे दर तासाला आकर्षक भेटवस्तू मिळवण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध पर्यायांसोबतच विविध विषयांवरील सेमिनार, फॅशन शो हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. या प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांना एकाच छताखाली विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉल्सला भेट देता येईल. प्रदर्शनात शनिवारी (दि. ४) फॅशन शो तसेच रविवारी विविध विषयांवर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ७५०७७७४६८२.

प्रदर्शनात सहभागी संस्था संदीप युनिव्हर्सिटी, के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी, गुरूगोबिंद सिंग फाउंडेशन (नाशिक), पारूल युनिव्हर्सिटी, सपकाळ नॉलेज हब, सिम्बायोसिस, डीआयडीटी, मॅक अॅनिमेशन, एनटीटीएफ (ठाणे), एएचए (नाशिक), पंचाक्षरी प्रोफेशनल अकॅडमी, स्फूर्ती करिअर कौन्सिल, अमोल कासार कॉमर्स अकॅडमी, शोध करिअर इन्स्टिट्यूट, सॅव्ही इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, फ्लाइंग कलर्स द युनिव्हर्स स्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र, करिअर लाँचर, विद्या एज्युकेशनल अकॅडमी, अरेना अॅनिमेशन

बातम्या आणखी आहेत...