आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूलभूत सुविधांपासून दूर असलेले कळवण तालुक्यातील गायदरपाडा गाव सुधारावे, यासाठी वेल्स ऑन व्हील्स संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने पुढाकार घेतल्याने गावाचे रुपडे बदलत आहे. गावात शिक्षण, आरोग्य, मुख्यतः महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याने गावातील समस्या सुटण्यास मदत होत आहे. गायदरपाडा डोंगराच्या कुशीत वसलेले खेडे. बहुतांश मोलमजुरी करणारे ग्रामस्थ या गावात आहेत. गायदरपाड्यातील ग्रामस्थांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींविषयी कोणापुढे कधीच अडचण मांडली नाही. २०२२ मध्ये दिवाळीनिमित्त गावात सुकदेव बागुल आणि त्यांचे युवा मित्र इलेक्ट्रिक खांबावर दिवे लावण्यासाठी पायी प्रवास करून या पाड्यात आले असता त्यांना खेड्यातील समस्यांची जाणीव झाली. या खेड्यात जाण्यासाठी पायी जावे लागते. समस्या प्रकल्प अधिकारी तथा प्रांत विशाल नरवाडे यांच्यापर्यंत पोहाेचली.
त्यांनी पाठपुरावा करून येथे सर्व शासकीय विभागाची बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. प्रशासकीय सर्व विभाग एकत्र आल्याने समस्यांचा निपटारा होण्यास मदत झाली. आदिवासी विभागाकडून पत्र्याचे शेड उभारून एकशिक्षकी शाळा सुरू करण्यात आली. मुलांना शालेय गणवेश देत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ५० कुटुंबातील महिलांना पाणी वाहून नेण्यासाठी जलचक्री वितरीत करण्यात आल्या. यामुळे डोक्यावरील हंडा हातात आला आहे. सिमेंट बंधाऱ्यासाठी २५ लाख रुपये मंजूर शाळेतील मुलांसाठी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आले. दवाखान्याची सोय तात्पुरती मोकभणगी गावात होणार आहे. गायदरपाड्यात सिमेंट बंधाऱ्यासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
वेल्स ऑन व्हील्स संस्थेमार्फत गायदरपाड्यात पाण्याची चक्री वाटप करताना संस्थेचे सदस्य. सिमेंट बंधाऱ्यासाठी २५ लाख रुपये मंजूर शाळेतील मुलांसाठी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आले. दवाखान्याची सोय तात्पुरती मोकभणगी गावात होणार आहे. गायदरपाड्यात सिमेंट बंधाऱ्यासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.