आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:शिक्षणाधिकारी वैशाली झनकर 8 लाखांची लाच घेताना अटकेत, 20% अनुदानप्रमाणे वेतन सुरू करण्यासाठी मागितली लाच

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळांना मंजूर २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात ८ लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह शासकीय वाहनचालक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला अटक करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुंबई येथे ही कारवाई केली. तक्रारदाराच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत कार्यादेश काढून देण्यासाठी झनकर-वीर यांच्यासाठी ९ लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तडजोडीअंती ८ लाखांची लाच स्वीकारत पुढील व्यवहार शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले आणि राजेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पंकज रमेश दशपुते यांच्यासोबत करण्यास वीर यांनी सांगितले. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पथकाने वीर यांच्यासह येवले व दशपुते यांनाही अटक केली. अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पल्लवी ढगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...