आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देणगी:एज्युकेशन सोसायटी ; डी. एम. कुलकर्णी यांच्याकडून नाएसो संस्थेस एक लाखाची देणगी

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतून शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले सेवाभावी शिक्षक डी. एम. कुलकर्णी यांनी नाशिक एज्युकेशन सोसायटीत सेवेला ५० वर्षे पूर्ण केली आहेत.

त्यांनी संस्थेच्या शतक महोत्सवी वर्ष निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम यांच्याकडे एक लाखाच्या देणगीचा धनादेश दिला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, मुख्याध्यापक कैलास पाटील उपस्थित होते. अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्यकारी व शिक्षक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...