आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सामाजिक जाणिवेतून वंचितांना शैक्षणिक मदत; रावळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन साेहळ्यात निर्णय

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निखळ, निरपेक्ष मैत्रीच्या ओढीने राज्यभरातून पुणे, ठाणे, मुंबई, जालना, बडोदा, सुरत, बंगलाेर येथून सर्व मित्र- मैत्रिणी रावळगाव (ता.मालेगाव) येथील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात सहभागी झाले. रावळगाव इंग्लिश स्कूलच्या १९९६ च्या बॅचचे दहावीचे ७० हून अधिक विद्यार्थी तब्बल २६ वर्षांनंतर एकत्रित आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत हाेता.

ज्ञानेश्वर मोहन व जयवंत रौंदळ यांनी मनाेगतात आयाेजनाची भूमिका मांडली. कोरोना काळात ज्या मित्रांनी स्वत:चा जीव धाेक्यात घालून फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम केले त्यांचा शिक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हिरामण लोंढे यांनी गीतगायन सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. दहावीच्या वर्गात बसून पुन्हा शाळेतील शिक्षकांनी तासिका घेत घडलेल्या घटना व किस्से सांगून पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याचा अनुभव घेतला.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक व साहित्याची मदत करण्याचा संकल्प करून त्यास देवेंद्र भामरे, श्रीरंग कुलकर्णी, सुरेश शिंदे, मनाेहर खांडेकर यांनी सर्वानुमते संमती दिली. सूत्रसंचालन प्रीती परदेशी, डाॅ. जय शर्मा यांनी केले. पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व टीसीएसमध्ये पदावर कार्यरत राहुल देशपांडे याने मनाेगत व्यक्त केले. यशस्वितेसाठी प्रशांत भामरे, योगेश शिरापुरे, दिलबर जाधव, निशांत बाेरसे आदींनी विशेष मेहनत घेतली.

बातम्या आणखी आहेत...