आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोदावरी संवर्धन समिती आयोजित दारणा नदी शिवार फेरी आज आयोजित केली होती. गाेदावरी नदीचे स्त्राेत जीवंत रहायला हवेत, त्याकरीता नदीला समजून घेण्यासह तीच्या उपनद्यां जीवंत राहणे गरजेचे आहे. याचा अभ्यास या शिवार फेरीतून केला जात आहे. गोदावरी नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात त्यात दारणा ही प्रमुख नदी असून या नदीवर भावली व दारणा अशी दोन धरणे बांधलेली आहेत तसेच या नदीवर जवळपास 13 उपनद्या आहेत, त्या सगळ्यांच्या उगमापासून गाेदावरीच्या संगमापर्यंतची पहाणी या शिवार फेरीतून केली जात आहे.
दारणा नदीचा उगम कुरुंग किल्ल्याच्या (कुलंग) पायथ्याशी कुरुंगवाडी या गावात आहे. कुलंग किल्ला व शेजारचा हिवाळा डोंगर याच्या घळीतून प्रवाह येतो तो खाली दारणा विहीर या ठिकाणी नदीचा उगम होतो.या विहिरीवरूनच स्थानिकांना पाणीपुरवठा होत असून त्या साठी विद्युत नसल्याने उंचीवरून नळीच्या साहाय्याने त्यांनी हे साध्य केले आहे.
यानंतर नदी ही काही अंतरावर असलेल्या कुरुंगवाडी व जांभडी या गावाच्या दरम्यान असलेल्या पुलाजवलील जंगलातून वाहत येते. याठिकाणी नदीचे पात्र लहान जरी असले तरी त्याठिकाणचे पाणी अतिशय स्वच्छ आहे. निसर्गसंपदा विपुल प्रमाणात असून अनेक वनस्पती याठिकाणी दिसतात त्यात फायकस व्हरायटीची झाडे तसेच कुंभी, धायती, कंदिलपुष्प, कोकीलाक्ष इ आयुर्वेदिक वनस्पती आढळून आल्या या वनस्पतींचा प्राथमिक उपचारासाठी उपयोग होतो असे स्थानिकांनी आम्हाला सांगितले . पुढे काही अंतरावर याच नदीवर बांधकाम व अतिक्रमण करून त्यात बोट क्लब बनवल्याचे आपल्या निदर्शनास आले पुढे भावली धरण याच नदी प्रवाहावर आहे.
या ठिकानापर्यंत नदी बऱ्यापैकी स्वच्छ दिसते, काही अंतरावर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. पुढे नदी घोटी सिन्नर रस्त्यावरील देवळी या गावाजवळ दारणा धरणाच्या बॅक वॉटर मध्ये मिळते पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. मानवी हस्तक्षेप, आधुनिकीकरण, शहरीकरण, या जरी काळाच्या गरजा असल्या तरी त्यामुळे निसर्ग प्रभावित होऊ नये अशी अपेक्षा सहभागी निसर्गप्रेमींनी व्यक्त केली. या ठिकाणी या शिवार फेरीच्या पहिल्या टप्प्याचा समारोप करण्यात आला, दुसरा टप्प्यात संगमपर्यंत शिवार फेरी घेण्यात येणार आहे.
या शिवार फेरीत गोदावरी नदी संवर्धन समितीचे निशिकांत पगारे, राजु शिरसाठ, नंदिनी नदी संवर्धन समितीचे प्रा सोमनाथ मुठाळ, कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे, आळंदी नदी संवर्धन समितीचे तुषार पिंगळे, वरुणा नदी संवर्धन समितीचे रोहित कानडे, शिवाजी पगारे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.