आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Efforts Should Be Made To Keep MIDC's Work Outstanding Balasaheb JhanjeEfforts Should Be Made To Keep MIDC's Work Outstanding Balasaheb Zanje

एमआयडीसीचा हीरक महोत्सव साजरा:एमआयडीसीचे कार्य उल्लेखनीय रहाण्यासाठी प्रयत्नशील राहावे - अधीक्षक बाळासाहेब झंजे

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक क्षेत्रात गेल्या 60 वर्षापासून अविरत सेवा बजावणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या फांद्या व मुळ्या सर्वत्र पसरवत राज्यातील इतर महामंडळाच्या तुलनेत एमआयडीसीचे कार्य उल्लेखनीय रहावे यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे यांनी केले आहे.

60 व्या वर्धापनाचे साधले औचित्य

एमआयडीसीच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, शशिकांत पाटील, नितीन पाटील, जयंत पवार, सुधीर चावरकर, विजय चौधरी,महेंद्र साली, बंडू शेवाळे आदी उपस्थित होते.

काय म्हणाले झंजे

यावेळी बोलतांना झंजे म्हणाले की, कोरोना काळात नाशिक विभागाने केलेल्या कार्याची दखल मुख्यालयाने घेतली असून महाराष्ट्रात नाशिकचे नाव अग्रस्थानी घेतले जात असून नाशिक विभागाचे कौतुक केले जात आहे. ज्या संस्थेत आपण काम करतो, ज्या संस्थेचे आपण घटक आहोत त्या संस्थेच्या नाव लौकिकासाठी अहो रात्र झटणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे मत प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी व्यक्त केले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम

दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा, इयत्ता 10 वी व 12 वीत यश संपादन केलेल्या एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा व 25 वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एमआयडीसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मनोरंजनासाठी रवी शेट्टी प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...