आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:रूम टू रीड इंडिया संस्थेंतर्गत वाचनसंस्कृती वाढीसाठी प्रयत्न

बोरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गटशिक्षण अधिकारी धनंजय कोळी व रूम टू रीड इंडिया संस्थेचे कार्यक्रम अधिकारी शिवकुमार केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांचे वाचन सुधारावे व वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने व घर एक शिक्षणाचे केंद्र या संकल्पनेने पालकांची भूमिका कशी असावी. या उद्देशाने बोरगाव येथे गुरुवारी (दि. ३) कार्यशाळा घेण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण बागुल व शिक्षक कृष्णा बागुल यांच्या उपस्थितीत सुरगाणा तालुका समन्वयक सुनील सिंग व कळवण तालुका समन्वयक हरिदास सरोदय यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यक्रम घेण्यात आला. नाशिक ग्रंथालय विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरतेसंदर्भात निपुण भारत मिशन हा उपक्रम पालकांपर्यंत पोहोचवणे व जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

यामध्ये पालकांची भूमिका कशी असावी, पालकांनी आपल्या मुलांना घरी अनुकूल शैक्षणिक वातावरण पुरवावे आणि आपल्याला मुलांना शिक्षणात सहकार्य करावे हे सांगण्यात आले. संस्थेमार्फत शाळेत मिळालेल्या गोष्टींच्या पुस्तकांमुळे मुलांमध्ये वाचन विकास, भाषा विकास, पूर्वी ज्ञान जागरूकता, कल्पना शक्तीला वाव कसा मिळेल हे सांगण्यात आले व याकरिता मोठ्याने वाचन करून दाखवण्यात आले. आजच्या वेळेस वाचनाचे महत्त्व काय आहे हे आणि वाचनामुळे मुलांमध्ये कोणते कौशल्य विकसित होतात हे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...