आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा:सुरगाण्यात बनावट नोटा छापणारे रॅकेट उघडकीस, बलसाडमधून आठ जण ताब्यात

नाशिक2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व आराेपी बलसाड पाेलिसांच्या ताब्यात आहेत

गुजरातमधील बलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यात पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीस अटक केली. या नाेटा सुरगाणा तालुक्यातील बाेरचोंड या गावी छापून त्या धरमपूरमध्ये चलनात आणल्या जात हाेत्या. याप्रकरणी १४८ बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या असून, एका व्यापाऱ्यासह अाठ जणांना ताब्यात घेतले अाहे. एकजण फरार आहे. यातील चौघे सुरगाणा तालुक्यातील आहेत.

बलसाडच्या गुन्हे अन्वेषण विभागाला ११ जूनला समडी चौकाच्या शेजारील आंबा मार्केटमध्ये धरमपूर तालुक्यातील मामा-भाचे गावातील रहिवासी झिपरुभाई संताभाई भाेये याच्याकडे ५०० रुपयांच्या ६० बनावट चलनी नोटा सापडल्या. या व्यक्तीच्या नावाने धरमपूर पोलिस ठाण्यात तक्रार होती. त्याआधारे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे साथीदार व इतर तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा सापडल्या.

तपासाअंती सर्व अाराेपींकडून ५०० रुपयांच्या १४८ बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. या सर्व बनावट नोटा तपासल्यानंतर सर्व नोटा एकाच सिरीजच्या होत्या. झिपरूभाई हा रिक्षाचालक असून ताे या बनावट नोटा बलसाड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात चलनात अाणत हाेता. दुसरा संशयित आरोपी परशाभाई मलाभाई पवार (रा. मुरदड, ता. धरमपूर, जि. बलसाड) हा झिपरूभाईकडून गरजेनुसार नोटा घेऊन चलनात अाणत होता. याचबराेबर या प्रकरणात चिंतूभाई झिपरभाई भुजड (रा. गडी, धरमपूर) यालाही अटक करण्यात अाली अाहे. सुरगाणा तालुक्यातील गुही येथे बलसाड पाेलिसांनी सुरगाण्यातील चौघांना शनिवारी (दि. १२) ताब्यात घेतले. सर्व अाराेपी बलसाड पाेलिसांच्या ताब्यात अाहेत. बाेरचोंड येथून हे रॅकेट सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...