आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:एकलहरे ग्रा.पं. सदस्य, वृत्तपत्रविक्रेते संजय ताजनपुरे यांचा सत्कार

नाशिकरोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकलहरे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलकडून वॉर्ड क्रमांक ६ मधून नाशिकरोड वृत्तपत्रविक्रेता सेवाभावी संस्थेचे सदस्य संजय महादू ताजनपुरे हे विजयी झाले. नाशिकरोड वृत्तपत्रविक्रेता सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक सुनील मगर, अध्यक्ष महेश कुलथे, सरचिटणीस भारत माळवे, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, माजी अध्यक्ष विजय सोनार, किशोर सोनवणे, सदस्य अनिल कुलथे, गौतम सोनवणे, बाबासाहेब ओहोळ, योगेश भट, सुनील सुर्यवंशी, ऋषिकेश आठभाई आदी उपस्थित होते. गावातील नागरी सुविधा प्राधान्याने साेडविणार असल्याचे यावेळी संजय ताजनपुरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...