आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Eknath Shinde Attend Wedding Thakeray Group MLA Wedding Nashik| Ajit Pawar|Nashik Newsठाकरे गट आमदार पुत्राच्या विवाहाला आज मुख्यमंत्री शिंदे लावणार हजेरी; अजित पवारही नाशिकमध्ये

चर्चा तर होणारच:ठाकरे गट आमदार पुत्राच्या विवाहाला आज मुख्यमंत्री शिंदे लावणार हजेरी; अजित पवारही नाशिकमध्ये

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.११) महत्त्वपूर्ण निकाल येत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोघेही नाशिकमध्ये येणार असल्यामुळे राजकीय हालचालींबाबत चर्चा रंगल्या आहेत.

हे दोन्ही प्रमुख नेते नाशिकमध्ये असून सर्वोच्च न्यायालयामधील ऑनलाइन सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

समर्थक जमण्याची शक्यता

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून किशोर दराडे व त्यांचे बंधू नरेंद्र दराडे हे दोघेही आमदार आहेत. यापैकी नरेंद्र यांचा उद्धव ठाकरे गटाकडे ओढा राहिला असून किशोर दराडेंचा मध्यंतरी शिंदे गटाकडे कल असल्याचे दिसून आले. दराडे यांनी शिंदे यांचे सख्य लक्षात घेत त्र्यंंबकेश्वर येथील खासगी लॉन्सवर मुलाच्या विवाहासाठी त्यांना आमंत्रण दिले आहे. दुसरीकडे याच वेळी राज्याचे विरोधी पक्षनेते पवार हेदेखील येत असल्याची चर्चा असून राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रमुख नेते नाशिकमध्ये येत असल्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना कार्यालयात लाइव्ह सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक येथील शिवसेना कार्यालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामधील लाइव्ह सुनावणी बघण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या हालचालींबाबत चर्चा होत आहे.