आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा15 ते 20 वेळा खरं म्हणजे हा शब्द, 5 ते 7 वेळा दिलेल्या शुभेच्छा, तुम्ही सूचना करा आम्ही काम करू असे 4 ते 5 वेळा सांगणे आणि मध्येच समृद्धी महामार्गावर जाऊन येत संमेलनातील गर्दी, ही संस्कृती परंपरा आपण जपली पाहिजे असा थाेडासा संमेलनाला, मराठी भाषेला स्पर्श भरुन पुन्हा एकदा खरं म्हणजे, शुभेच्छा, सूचना व्हाया ‘समृद्धी’वर येत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मुद्द्यांना सुरुवात करुन ते पूर्ण न करताच पुढच्या मुद्यांकडे वळून उपस्थितांना असंबद्ध साहित्याचा एक वेगळाच अनुभवच दिला. त्यापेक्षा कुमार विश्वास यांना बाेलण्यासाठी वेळ वाढवून दिली असती तर बरे झाले असते असा सूरही उपस्थितांमध्ये उमटला.
वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य संमेलन नगरत 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या उद्घाटकीय भाषणाने उपस्थितांना मात्र कंटाळा आणला. मी सगळ्यांचे स्वागत करताे, मला उद्घाटन करायला मिळेल असे वाटले नव्हते, उपस्थित सगळ्यांना शुभेच्छा.
मराठी भाषेसाठी पंढरीची वारी करावी तसे या संमेलनाला आले त्यांचे ‘स्वागत’ करताे, ‘शुभेच्छा’ देताे. आपली मराठी भाषा, संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे सदृढ सांस्कृतिक लाेकशाहीच विराट रुप आहे. मुंबर्इतील विश्व संमेलनाचे काैतुक झाले. ‘खरं म्हणजे’ संस्कृती, परंपरा जपण्याच्या पाेषणाला त्यामुळे हातभार लागताे. संमेलनात राजकारण्यांचे काम नाही. हस्तक्षेप नाही. आज साहित्यिकांचं राज्य आहे.
‘खरं म्हणजे’ साहित्यिक समाजसेवाच करतात. ‘खरं म्हणजे’ राजकारणी आणि साहित्यिकांची सामाजिक तळमळ असते. वरीष्ठांना कान धरण्याचा अधिकार आहे. लेखक कवी सांस्कृतिक आरसा आहे, त्यातून मातीचा गंध येताे. ज्यांना ज्ञानपीठ मिळाला ताेच वारसा आपण पुढे नेत आहाेत. ती संस्कृती, परंपरा जपली पाहिजे. ग्रामीण भागातील बदलांची नाेंद घ्यावी. आपण ‘समृद्धी’ बांधला. 11 जिल्हे आणि अनेक गावे जाेडली. त्यावरुन साहित्यिकांनी जाऊन गावाचे प्रश्न मांडावे. असे म्हणून साहित्य अविभाज्य भाग आहे, ‘समृद्धी’साठी सरकार वचनबद्ध आहे. ‘खरं म्हणजे’ तुमच्या काही सूचना, मार्गदर्शन आले तर ते द्या, प्रकल्प खऱ्या अर्थाने मार्गी लागतील. तंत्रज्ञानातून, जागतीक पातळीवर नाेकरी व्यवसायाला असंख्य संधी आहेत. विदेशात जाण्याचं प्रमाण वाढते आहेत.
आपल्या मातीत मुबलक संधी आहे. जय जय महाराष्ट्र गीताला राज्य गीताचा दर्जा दिला. महाराष्ट्रा बाहेरील मराठी संस्थांना 25 लाख देणार. संमेलनातून विचारांची देवाण-घेवाण हाेइल असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ‘शुभेच्छा’ दिल्या. मुख्यमंत्री या मुद्द्यावरुन त्या मुद्द्यावर जात हाेते. साहित्याच्या संर्दभात भाषणात ठाेस असा काेणताच मुद्दा नसल्याने उपस्थित मात्र चांगले कंटाळले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.