आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत ९० लाख ते एक काेटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आराेप नियामक मंडळातील काही सदस्यांनी केल्याने गेल्या काही दिवसांपासून परिषदेचे कामकाज ठप्प आहे. तसेच विविध विषयाने प्रकरण न्यायालयातही प्रलंबित असल्याने नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी पुढील निवडणुकीसाठी अडसर ठरत हाेता. यातून मार्ग काढत परिषदेचे तह्यात विश्वास्त शरद पवार यांनी सर्व प्रकरण आता संपवा व आधी नाट्य परिषदेची निवडणूक जाहीर करण्याचे आदेश देतानाच गुरुनाथ दळवी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड केली. त्यानुसार मार्च-एप्रिल २०२३मध्ये नाट्य परिषेदच्या माध्यवर्ती शाखेची निवडणूक आता हाेणार आहे.
नियामक मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभाही हाेत नसल्याने सभासद संतप्त झाले हाेते. अखेरीस नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष, उद्याेगमंत्री उदय सामंत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शरद पवार यांच्याशी चर्चा करत मुंबईत यशवंतराव नाट्य संकुलात नियामक मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष प्रसाद कांबळी, प्रमुख कार्यवह शरद पाेंक्षे, अशाेक हांडे, नाथा चितळे, राजन भिसे, सविता मालपेकर, विजय गाेखले, विजय कदम आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित हाेते. प्रथमच ६०० सभासद उपस्थिती : नाट्य परिषदेच्या इतिहासात वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रथमच माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी, साेलापूर, अहमदनगगर, उस्मानाबाद, जळगाव अशा राज्यातील विविध शाखांचे पदाधिकारी आणि सभासद या बैठकीला मुंबईत हजर हाेते.
चाैकशीची टांगती तलवार यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची देखील विद्यमान पदाधिकाऱ्यांनी चाैकशी केली हाेती. त्यामुळे आता नवीन कार्यकारिणी जेव्हा निवडून येईल, तेव्हा ती कार्यकारिणीदेखील या आर्थिक गैरव्यवहाराची चाैकशी लावण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.