आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कॅम्पला निवडणूक; राजकीय‎ हाेर्डिंग्ज लावणारे रडारवर‎

देवळाली कॅम्प‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या‎ निवडणुकीच्या पार्श्भूमीवर‎ कॅन्टोन्मेंट प्रशासनाने हाेर्डिंग्ज बोर्ड‎ काढण्याची मोहीम हाती घेतली‎ असल्याचे कर अधीक्षक विजय‎ गायकवाड यांनी सांगितले.‎ शहरातील रस्त्यांच्या कडेला‎ लावण्यात आलेले राजकीय फलक,‎ होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे, भित्तिपत्रके‎ काढण्याच्या मोहिमेला‎ प्रशासनाकडून रविवारी (दि. ५)‎ सुरुवात करण्यात आली.

शहरातली‎ झेंडा चौक, जुने बस स्थानक,‎ संसारी नाका, लामरोड, रेस्ट कॅम्प‎ रोड, विजय नगर, वडनेर रोड,‎ शिगवे बहुला आदी परिसरात‎ प्रशासनाचे कर अधीक्षक विजय‎ गायकवाड, आरोग्य निरीक्षक‎ शिवराज चव्हाण २ वाहने व १५‎ कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा समावेश‎ असलेल्या पथकाकडून ही कारवाई‎ करण्यात आली. यापुढे शहरात‎ कोणीही राजकीय कार्यक्रम कोणीही‎ घेतांना आढळल्यास आचारसंहिता‎ भंग होणार नाही याबाबत खबदारी‎ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी‎ अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...