आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमधून या शहरांमध्ये उत्पादने पाठविण्यासाठी लागणारा वेळ, पैसा यांचा उद्याेगांना हाेणारा जाच आता टळणार आहे. नाशिकमध्ये उभारण्यात येत असलेली प्रादेशिक तपासणी प्रयाेगशाळेचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. दाेन-तीन महिन्यात ही लॅब भोपाळच्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेकडे हस्तांतरित हाेइल, त्यानंतर यावर्षी ती कार्यरत हाेइल.
नाशिक हे इलेक्ट्रीकल उद्याेगांसाठी देशभरात ओळखले जाते, ब्रेकर्स आणि स्विच गियर्स निर्मीतीचे हब म्हणून नाशिकची ख्याती आहे. असे असले तरी या उद्याेगांत तयार हाेणारी उत्पादने भाेपाळ किंवा बंगळूरू येथील केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान च्या टेस्टींग लॅबाेरटरीकडे अंतीम तपासणीसाठी पाठविली जातात. तेथून ती मान्य झाली की, मगच ही उत्पादने बाजारात विक्रिसाठी पाठविता येतात.
इलेक्ट्रिक उत्पादनांच्या तपासण्या, संशोधन आणि प्रमाणन सीपीआरआय ची ही इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब नाशिकपासून अवघ्या 12 किलोमीटरवर शिलापूर येथे 100 एकर जागेवर उभी राहत आहे. 12 व्या पंचवार्षिक योजनेतून याकरिता 115 कोटी रुपये मंजूर झालेले असून डिसेंबर 2018 मध्ये त्याचे भूमिपूजन झाले हाेते. 18 महिन्यात म्हणजे 2020 या वर्षात ही लॅब सुरू होणार हाेती मात्र त्याला वर्षभरापेक्षाही अधिकचा उशीर झाला असून काेराेना काळातील विविध निर्बंधांमुळे वर्षभरात कामावर परिणाम झाल्याचे कारण यामागे सांगितले जाते.
दिव्य मराठीने केलेल्या पहाणीत, ह्या लॅबची उभारणी अंतीम टप्प्यात आली असून, विविध मशिनरीज, तपासणी उत्पादने येथे पाेहाेचली आहेत. त्याचे इन्स्टाॅलेशन लवकरच सुरू हाेइल. विद्युत विभागाने विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू केले असून वेगवेगळ्या तपासणीसाठी स्वतंत्र इमारती येथे उभ्या राहील्या आहेत.
इलेक्ट्रीक उत्पादनांच्या तपासण्या, संशाेधन आणि प्रमाणन यांची सुविधा येथे उपलब्ध हाेणार असल्याने नाशिकच नाही तर पश्चिम भारतातील उद्याेगांना त्यांची उत्पादने बंगळुरू किंवा भाेपाळला पाठवायची गरज उरणार नाही. आज, ही उत्पादने पाठविण्यासाठी वाहतुकीचा मोठा खर्च तर लागताेच शिवाय तेथे माेठी प्रतिक्षाही करावी लागते. तपासणीसाठी लागणारा माेठा वेळ, वाहतुकीचा खर्च यांचा भार उद्याेगांना सहन करावा लागतो. हे सगळे आता या नव्या सुविधेमुळे टळू शकणार आहे. या प्रकल्पामुळे किमान दीड हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राेजगार निर्मिती हाेवू शकणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.