आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत प्रवाह अचानक वाढल्याने घरातील उपकरणे जळाले:वीज मंडळाचा सिडकोतील राजरत्न नगर भागातील रहिवाशांना फटका

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्युत महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव नागरिकांना अनेक वेळा येत असतो. असाच प्रकार पवन नगर, राजरत्न नगर भागात घडला असून अचानक पणे आलेल्या उच्च विद्युत दाबाने नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, मोबाईल, केबल सेट बॉक्स जळाले. ही घटना गुरुवारी दुपारी दोन ते चारवाजेच्या सुमारास घडले आहे

नागरिकांचा संताप

सिडकोतील जुना प्रभाग २९ मध्ये मर्चंट बँकेच्या पाठीमागील परिसरात महावितरणचा विद्युत ट्रांसफार्मर आहे. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठा जाळ निघाला. यावेळी संपूर्ण परिसरात उच्च विजेचा दाब वाढून वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी अनेक नागरिकांच्या घरातही मोठा आवाज झाला. त्याचवेळी घरांमधील टीव्ही, फ्रिज, कम्प्युटर, विजेची मोटर, फॅन, एलिडी लाईट यासह विविध विद्युत उपकरणे बंद पडली होती.

महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकदा परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वेळोवेळी मेंटेनेसची कामे केली जात नसल्याने शॉर्टसर्किट होत आहे. त्यामुळे महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभारा विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिडकोतील त्रिमूर्ती चौक कामटवाडे भवन नगर राजसत्ता नगर भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांना मंडळाच्या कारभाराला सामोरे जावे लागत आहे राजा धनगर भागात विजेचा अतिरिक्त दाब वाढल्यामुळे घरातील विद्युत सुख करणे जागेवरच आवाज होऊन जाले आहेत सुदैवाने या उपकरणांच्या जवळ कोणी घरातील लहान मुलं व्यक्ती नसल्याने दुर्घटना टाळली. अन्यथा मोठ्या प्रमाणात आग लागून घरगुती साहित्य असा जीवित आणि देखील होण्याची शक्यता न करता येत नाही.

''घरातील सर्व विजेच्या उपकरणांमधून धूर निघाला - आमच्या घरातील विजेच्या सर्व उपकरणांमधून धूर निघाला. सुदैवाने आम्ही घरात असल्याने आग लागली नाही. सर्वच वस्तू निकामी झाल्या आहेत. वीज महामंडळाने आम्हाला भरपाई द्यावी.'' - मंगेश निकुंभ, नागरिक.

बातम्या आणखी आहेत...