आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:हिरेनगर येथील पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी सदोष

नांदगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथे झालेल्या पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी सदोष असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी योजनेची वीज जोडणी योग्य पद्धतीने करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेतून हिरेनगर येथे पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली. पाणी उपसा करण्यासाठी असलेल्या वीजपंपाची जोडणी नाग्यासाग्या धरणाच्या पाण्याच्या पंधराशे फूट पलीकडून करण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मर सुद्धा नांदुर शिवारात आहे.

बातम्या आणखी आहेत...